पुणे | जून २०२५ :- कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर, राज्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आपत्कालीन आढावा बैठकीत प्रशासन, पोलीस आणि स्थानिक यंत्रणांना ठोस कार्यवाहीचे आदेश दिले.
धोका ओळखा, तत्काळ कारवाई करा!
मुख्य सचिव सौनिक यांनी स्पष्टपणे सांगितले की, ➡️ धोकादायक पर्यटनस्थळांवर तात्पुरती बंदी घालावी. ➡️ सूचनाफलक व मार्गदर्शक सूचना लावाव्यात. ➡️ सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत. ➡️ दुरुस्ती होईपर्यंत पर्यटनस्थळ पूर्णतः बंद ठेवावं.
सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई!
“प्रशासन किंवा पोलीस यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. “पर्यटकांची जीवितहानी होऊ नये, हीच आपली प्राथमिकता आहे,” असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.
पूल व रस्ते तपासणीला गती!
या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला पुढील निर्देश देण्यात आले – ✔️ सर्व रस्त्यांवरील जुने पूल तपासा ✔️ आवश्यक असल्यास दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी करा ✔️ धोका निर्माण करणारे रस्ते तात्पुरते बंद ठेवा
होमगार्ड, एनसीसी यांच्याकडून मदत!
मुख्य सचिवांनी होमगार्ड, एनसीसी व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ➡️ सहाय्यता केंद्र ➡️ आपत्कालीन हेल्पलाइन ➡️ प्राथमिक उपचार यंत्रणा उभारण्याचे आदेशही दिले.
आढावा बैठकीस कोण होते उपस्थित?
🔹 पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार 🔹 जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी 🔹 पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह 🔹 वरिष्ठ पोलीस अधिकारी
या सर्वांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली आणि आपापल्या यंत्रणांमार्फत सुरक्षा उपाययोजनांचा आराखडा सादर केला.
नागरिकांना आवाहन:
“पर्यटन ठिकाणी जाताना हवामान व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. सोशल मीडियावर मिळालेल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आपली आणि इतरांची सुरक्षाच सर्वात महत्त्वाची!” – प्रशासन