Home Breaking News टिळेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये एकमताने नेतृत्वाची निवड – संतोष राऊत अध्यक्ष, अमर टिळेकर उपाध्यक्ष!

टिळेकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये एकमताने नेतृत्वाची निवड – संतोष राऊत अध्यक्ष, अमर टिळेकर उपाध्यक्ष!

30
0

उरुळी कांचन (पुणे) | हवेली तालुका :- हवेली तालुक्यातील टिळेकरवाडी गावात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी संतोष सुखदेव राऊत यांची तर उपाध्यक्षपदी अमर अंकुश टिळेकर यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. गावातील सर्व घटकांच्या सहमतीने व एकीने हा निर्णय घेतल्यामुळे गावात सामंजस्याचे व सलोख्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.

विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही
नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष राऊत आणि उपाध्यक्ष अमर टिळेकर यांनी गावकऱ्यांनीlok दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “सर्व समाजात ऐक्याचे, शांततेचे आणि प्रगतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू,” अशी ग्वाही दिली.

ग्रामपंचायतीच्या सर्व मान्यवरांची उपस्थिती
या निवडीप्रसंगी गावातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच गणेश टिळेकर, उपसरपंच वैशाली चौरे, माजी सरपंच सुभाष लोणकर, सदस्य सुशील राऊत, गोवर्धन टिळेकर, नंदाताई राऊत, ग्रामसेवक प्रवीण खराडे, पोलीस पाटील विजय टिळेकर यांच्यासह दिलीप, श्याम, राजेंद्र, सुभाष, अक्षय, विकास, रोहन, धर्मेंद्र, प्रशांत, मच्छिंद्र, प्रणव, सौरभ टिळेकर व विनोद बेंगळे, झगडे आदींचा समावेश होता.

एकतेचा व आदर्श गावकारभाराचा संदेश
या बिनविरोध निवडीमुळे टिळेकरवाडीने पुन्हा एकदा गाव एकतेचा आदर्श ठेवला असून, विकासाच्या वाटचालीसाठी गावातील नेतृत्व एकत्र असल्याचे याचे जिवंत उदाहरण ठरले आहे.