मुंबई : पश्चिम रेल्वेने एक मोठा निर्णय घेत मुंबईकरांना येत्या शनिवार आणि रविवारी (26 आणि 27 एप्रिल) प्रवास नियोजनात बदल करावा लागणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान असलेल्या पुल क्रमांक 61 वर रिगर्डरिंगचे (Re-Girdering) काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर 35 तासांचा मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
रिगर्डरिंगसाठी 35 तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, हा ब्लॉक शनिवार 26 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता सुरु होऊन सोमवार 28 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. या ब्लॉकदरम्यान पाचवा मार्ग (Carshed Line), कांदिवली ट्रॅफिक यार्ड लाईन, आणि इतर स्थानकांवरील जोड रेषांवर काम केले जाईल. या काळात अनेक लोकल सेवा तसेच मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
लोकल आणि एक्सप्रेस सेवांवर परिणाम
-
शनिवार 26 एप्रिलला 73 लोकल सेवा रद्द
-
रविवार 27 एप्रिलला 90 लोकल सेवा रद्द
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी, विनीत अभिषेक यांनी सांगितले की, ब्लॉकदरम्यान 5व्या मार्गावर धावणाऱ्या मेल/एक्सप्रेस गाड्या फास्ट लाईनवर वळवण्यात येणार आहेत.
एक्सप्रेस गाड्यांचे मार्गबदल :
-
19417 बोरिवली-अहमदाबाद एक्सप्रेस (27 एप्रिल) : वसई रोडपासून सुरू होईल. बोरिवली ते वसईदरम्यान रद्द.
-
19425 बोरिवली-नंदुरबार एक्सप्रेस (26 व 27 एप्रिल) : भाईंदरपासून सुरू होईल. बोरिवली ते भाईंदरदरम्यान रद्द.
-
19426 नंदुरबार-बोरिवली एक्सप्रेस (26 एप्रिल) : वसई रोड येथे संपेल. वसई ते बोरिवलीदरम्यान रद्द.
उन्हाळी गर्दीसाठी विशेष गाड्यांचे फेरे वाढवले
यात्रेच्या वाढत्या मागणीमुळे पश्चिम रेल्वेने 4 जोड्या विशेष गाड्यांचे फेरे वाढवले आहेत. विशेषत: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
वाढवलेल्या विशेष गाड्या :
-
09001 मुंबई सेंट्रल – खातीपूरा विशेष : 26 मेपर्यंत वाढ
-
09002 खातीपूरा – मुंबई सेंट्रल विशेष : 27 मेपर्यंत वाढ
-
09003 मुंबई सेंट्रल – दिल्ली विशेष (Bi-Weekly) : 27 जूनपर्यंत
-
09004 दिल्ली – मुंबई सेंट्रल विशेष : 28 जूनपर्यंत
-
09007 वलसाड – खातीपूरा (Weekly) विशेष : 22 मेपर्यंत
-
09008 खातीपूरा – वलसाड (Weekly) विशेष : 23 मेपर्यंत
-
09425 साबरमती – हरिद्वार विशेष : 29 जूनपर्यंत
-
09426 हरिद्वार – साबरमती विशेष : 30 जूनपर्यंत