लोणावळा :- आई एकवीरा देवीच्या पवित्र स्थानी भाविकांच्या सेवेसाठी नवी मुंबईची मानाची पालखी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. शैलेश भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी “आपला गड, आपली जबाबदारी” ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली. एकवीरा देवीच्या मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात, त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होतो. या मोहिमेअंतर्गत कचरा उचलणे, प्लास्टिक निर्मूलन आणि स्वच्छता जनजागृती यावर विशेष भर देण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर, आई एकवीरा प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी मोफत प्राथमिक उपचार केंद्र आणि आरोग्य सेवा पुरवण्यात आली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सेवा भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यात्रा काळात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अनेक भाविकांना तब्येतीच्या तक्रारी जाणवतात. यासाठी प्रतिष्ठानच्या मेडिकल टीमने मोफत तपासणी आणि प्राथमिक उपचार सेवा पुरवली.
मेडिकल टीममध्ये विशेष योगदान देणारे सदस्य:
कुमारी. मयुरी पाटील श्री. हेमंत वैती श्री. मंदार टेमकर श्री. देवेश पेरेकर सौ. मानिनीताई वरळीकर
स्वच्छता आणि आरोग्याच्या या महत्वपूर्ण उपक्रमामुळे अनेक भाविकांना दिलासा मिळाला. भाविक आणि स्वयंसेवक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत एकवीरा देवीच्या मंदिर परिसराच्या स्वच्छतेत योगदान दिले.
या स्तुत्य उपक्रमाचे सामाजिक स्तरावर कौतुक!
सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या दोन उपक्रमांनी एक सकारात्मक संदेश दिला आहे. “स्वच्छता हीच सेवा” आणि “आरोग्य हीच खरी संपत्ती” याचे उत्तम उदाहरण या उपक्रमातून घालून देण्यात आले.
🔹 “आपला गड, आपली जबाबदारी!” 🔹 भाविकांसाठी मोफत आरोग्य सेवा – एकवीरा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम! 🔹 स्वच्छ गड, निरोगी समाज – तुमच्याही सहभागाची गरज!