Home Breaking News पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ६८३ किलो गांजाचा नाश

पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; ६८३ किलो गांजाचा नाश

82
0

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मागील काही महिन्यांत केलेल्या ५२ कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल ६८३.८३० किलो गांजा नुकताच नष्ट करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे.

▶️ मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रम:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शासकीय विभागांना सात कलमी कार्यक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये नागरिक केंद्रित शासकीय सेवा, प्रलंबित प्रकरणांची सोडवणूक आणि स्वच्छता मोहिमांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गांजाच्या विक्री व बाळगणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई केली आहे.

▶️ गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया:

अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) विवेक पाटील, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार केले. या पथकाने ५२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या ६८३.८३० किलो गांजा नष्ट करण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या.

▶️ रांजणगाव एमआयडीसी येथे गांजा नष्ट:

महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीत फॉरेन्सिक लॅब पुणे, राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे यांच्या उपस्थितीत गांजा नष्ट करण्यात आला.

▶️ सहभागी अधिकारी आणि कर्मचारी:

ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र बांबळे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर परदेशी, मयूर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, संतोष स्वामी, सदानंद रुद्राक्षे, रणधीर माने आणि कपिलेश इगवे यांनी केली.