Home Breaking News शेअर बाजारातील बनावट परताव्याचं आमिष; पुण्यातील तरुणाची ४४ लाखांची फसवणूक! सायबर चोरटे...

शेअर बाजारातील बनावट परताव्याचं आमिष; पुण्यातील तरुणाची ४४ लाखांची फसवणूक! सायबर चोरटे सक्रिय, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

53
0
पुणे शहरात सायबर फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढताना दिसत आहेत. चतुःशृंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला शेअर बाजारातून जास्त परताव्याचं आमिष दाखवत अज्ञात सायबर चोरट्यांनी तब्बल ₹४४ लाख ८१ हजारांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सदर तरुणाला फेब्रुवारी महिन्यात एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला, ज्यात ‘शेअर बाजारातून भरघोस परतावा मिळेल’ असे सांगितले होते. यानंतर संबंधित चोरट्यांनी काही बनावट प्लॅटफॉर्मद्वारे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला काही प्रमाणात परतावा मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला आणि त्याने एकूण ४४ लाखांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बँक खात्यांमध्ये जमा केली.
पण काही दिवसांनी परतावा बंद झाला आणि संपर्क तुटल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तरुणाने तातडीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक अश्विनी ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे.
सायबर पोलिस आणि पुणे शहर पोलिस प्रशासनाने पुन्हा एकदा नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आकर्षक परताव्याच्या भूलथापांना बळी न पडता, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी खात्री करणे अत्यावश्यक आहे. सावध रहा, सुरक्षित रहा!