पुणे, १९ एप्रिल २०२५ – पुणे शहरातील सहकारनगर परिसरात महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत विनयभंग करणाऱ्या आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल असलेल्या दिपक शिवाजी ठाकर या फरार आरोपीला सहकारनगर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील उज्जैन येथून शिताफीने अटक केली आहे.
घटनेचा आढावा
२४ मार्च २०२५ रोजी पीडित महिला घरी जात असताना आरोपी दिपक ठाकर याने तिचा पिस्तुलाचा धाक दाखवून विनयभंग केला. त्यामुळे पीडितेने तात्काळ सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या आधारे आरोपीविरोधात खालील कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला:
-
भादंवि कलम ७४, ७८, ३५१(२)
-
अॅट्रॉसिटी कायदा २०१५ अंतर्गत कलम ३(१)(w)(i)(ii), ३(२)(va)
-
शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३(२५)