पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी या थोर क्रांतिकारकांच्या प्रतिमेस तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग व शहीद नारायण दाभाडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास उप आयुक्त अण्णा बोदडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.