Home Breaking News Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’...

Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीविरोधात महाराष्ट्र परिवहन विभागाचा मोठा निर्णय, ‘या’ वर्षांपर्यंत परवाना बंदी

118
0

Porsche Accident Pune Updates : शिवसेना नेते अजय भोसले यांनी २००९ सालचा तो प्रसंग सांगून परवा झालेल्या अपघातातील तरुणांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

Pune Porsche Crash Latest Updates : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात झालेल्या अपघातात एक अल्पवयीन मुलगा दोषी आढळला आहे. मद्यधुंद अवस्थेत परवाना नसताना त्याने बेदरकारपणे वाहन चालवल्याने दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची आता चौकशी सुरू आहे. दरम्यान, या अल्पवयीन मुलाच्या आजोबांवरही खटला चालू आहे. शिवसेना नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी छोटा राजनला देण्यावरून हा खटला सुरू आहे. अजय भोसले यांनी आज टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरण समोर आल्यानंतर अग्रवाल कुटुंबियांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर चर्चा केली जातेय. या प्रकरणातील आरोपीच्या आजोबांवरही खटला सुरू आहे. याबाबत अजय भोसले म्हणाले, “माझी आणि राम कुमार अग्रवाल यांच्याशी मैत्री होती. या दोन (सुरेंद्र अग्रवाल आणि राम अग्रवाल) भावांत मालमत्तेवरून काही वाद चालू झाले होते. त्यामुळे हा वाद मी मिटवावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु, ही घरगुती समस्या असल्याने त्यांनी तो मिटवावा असं मी त्यांना म्हटलं. मी राम अग्रवालला सहकार्य करत असल्याचा दावा सुरेंद्र अग्रवालांनी केला होता. दरम्यान, हा वाद सुरू असताना सुरेंद्र अग्रवाल हे बँकॉगला जाऊन छोटा राजनला भेटून आले आणि त्यांना सुपारी दिली. त्यावेळी मला छोटा राजनचे फोन यायचे, मी त्याच्याशी फोनवर बोलायचो. मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की तुमच्या (अग्रवाल कुटुंबातील) घरातील भांडणं आहेत, तुम्ही घरात मिटवून घ्या. परंतु, सुरेंद्र अग्रवालने छोटा राजनला जाऊन सांगितलं की अजय भोसलेच हे घडवून (कुटुंबातील समेट) देत नाहीय.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here