पिंपरी–चिंचवड :- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (क) – सर्वसाधारण ओपन महिला वॉर्ड मधून अॅड. राधिका उल्लास कुलकर्णी या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकारण चांगलेच तापले आहे. सुशिक्षित, अभ्यासू आणि सर्वसामान्यांशी थेट संपर्क असलेले नेतृत्व म्हणून राधिका कुलकर्णी यांची ओळख असून, नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
मतदान दिनांक : १५ जानेवारी २०२६ वेळ : सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.००
राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक घड्याळ हे निवडणूक चिन्ह घेऊन त्या मतदारांसमोर जात असून, “बटन घड्याळाचे, वेळ बदलण्याचे” असा स्पष्ट विकासाचा संदेश त्या देत आहेत. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य कुटुंबांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाय करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, महिलांची सुरक्षितता, मुलांसाठी शिक्षण सुविधा आणि युवकांसाठी संधी निर्माण करणे या मुद्द्यांना प्राधान्य देत त्या प्रचार करत आहेत. “महानगरपालिकेचा विकास केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे,” असे मत अॅड. राधिका कुलकर्णी यांनी व्यक्त केले आहे.
नागरिकांच्या हक्कांसाठी लढणारे आणि कायद्याचे सखोल ज्ञान असलेले नेतृत्व म्हणून त्या ओळखल्या जात असून, महापालिकेत गेल्यास प्रभागातील प्रत्येक प्रश्न सभागृहात ठामपणे मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या धोरणांवर विश्वास ठेवत प्रभाग २५ (क) मधील मतदारांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.