पिंपरी :- सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या कार्यकाळात प्रामाणिकपणे व जबाबदारीने बजावलेली सेवा ही संस्थेच्या कार्यक्षमतेसाठी मोलाची ठरली असल्याचे प्रतिपादन उप आयुक्त संदीप खोत यांनी केले तसेच सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आरोग्यदायी,आनंदी व समाधानकारक जावे अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या आणि पुढील जीवनप्रवासात नवे उपक्रम व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा असे मत व्यक्त केले.

