प्रहार तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांच्या हद्दपारिमध्ये माननीय विभागीय आयुक्त साहेब महसूल अमरावती यांनी उपविभागीय दंडाधिकारी अकोट यांना प्रकरण परत पाठवून 30 दिवसाच्या आत न्यायचित आदेश पारित करण्याचे दिनांक 26.11,2025 रोजी दिले आदेश सबब माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब अकोट यांनी दिनांक 4 9 2025 रोजी आखरे यांचा अकोला जिल्ह्यामधून सहा महिन्याकरिता हद्दपारचा आदेश पारित केला होता त्या आदेशाविरुद्ध आखरे यांचे वकील श्री काकडे साहेब यांनी माननीय विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांच्याकडे अपील अर्ज दाखल केला होता त्यामध्ये स्पष्ट म्हटले होते की सदरहू आखरे यांनी ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथील भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे राजकीय दबाव तंत्र वापरून संबंधित भ्रष्टाचारी लोकांनी आखरे यांची हद्दपारी ही चुकीच्या पद्धतीने व परत परत तेच गुन्हे घेऊन व दुसऱ्याच्या नामे असलेले गुन्हे टाकून आदेश पारित करण्यात आलेला आहे त्यासंबंधी आखरे यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये यासंबंधी अपील सुद्धा दाखल केली होती माननीय उच्च न्यायालयाने सुद्धा अकोट उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांना स्पष्ट म्हटले होते की सदरहू आखरे यांचे सर्व म्हणणे विचारात. घेऊन आदेश पारित करावा परंतु राजकीय वजनापोटी घाईघाईने उपविभागीय अधिकारी साहेब आकोट यांनी हद्दपाईचा आदेश पारित केला होता माननीय विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांनी आदेशामध्ये स्पष्ट म्हटले आहे की सदरहु सर्व दस्तावेजांची तपासणी केली असता आखरे यांचा अपील अर्ज अंशतः मान्य करण्यात येत आहे , व आधीच्या हद्दपारतील गुन्हे या हद्दपारमध्ये सुद्धा गह्य धरण्यात आलेले आहेत, व क्रमांक एक चा गुन्हा हा आखरे यांच्यावर बोध होत नाहीये म्हणून हे प्रकरण बंद करून अभिलेखागार कक्षामध्ये ठेवण्यात येत आहे व तीस दिवसाच्या आत सुनावणी घेऊन माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब अकोट यांनी न्यायोचीत आदेश पारित करावा असे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांनी दिले आहेत सदरहू आखरे यांच्याशी फोन द्वारे बोलणे झाले असता आखरे यांनी म्हटले आहे की सत्य केव्हा ना केव्हा बाहेर येतच असते आणि ते या आदेशावरून बाहेर आले सुद्धा परंतु माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब आकोट यांनी 2024 मध्ये सुद्धा माझा हद्दपरीचा आदेश काढला होता त्यामध्ये सुद्धा दोन गुन्हे दुसऱ्याच्या नावाचे माझ्या हद्दपरीच्या आदेशामध्ये टाकण्यात आले होते तेव्हा सुद्धा त्या प्रकरणात आयुक्त साहेब यांनी न्याय दिला होता आता परत 2025 च्या प्रकरणांमध्ये सुद्धा तेच झाले परंतु राजकीय दबावापोटी चुकीच्या पद्धतीने मागील हद्दपारी काढण्यात आली होती त्यामुळे मला जो आधीच्या हद्दपारिमध्ये सहा महिने व आताच्या हद्दपारीमध्ये तीन महिने जिल्हा बाहेर राहावे लागले त्यामुळे माझे न भरून निघणारे नुकसान झाले आहे त्यासंबंधी मी न्यायालयात दाद मागणार आहे असे त्यांनी सांगितले


