मागील वर्षापासून ज्ञानेश्वर आखरे हे गावातील जनतेच्या हिताकरता आलेल्या निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारा संबंधात व जनतेच्या समस्या सोडवण्याकरिता लढा देत होते लढा देत असताना सर्वात आधी माहितीच्या अधिकारातील माहिती मिळावी याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे चार दिवस अन्न त्याग उपोषण करावे लागले होते , त्यानंतर गावातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे व अपंग दिव्यांग यांना पाच टक्के निधी मिळावा व सफाई कर्मचारी यांचे पगार मिळावे याकरिता 15 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीन दिवस अन्न त्याग उपोषण करावे लागले होते आणि माहितीच्या अधिकारामधील मिळालेल्या माहितीनुसार ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे 14 वा वित्त आयोग पंधरावा वित्त आयोगामध्ये झालेल्या अनियमित्तते बाबत आखरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती परंतु तक्रारीची चौकशी ही आठ महिन्यानंतर करण्यात आली होती आखरे यांनी पाठपुरावा हा वेळोवेळी केल्यामुळे 29 8 2025 रोजी आखरे यांना चौकशी अहवाल देण्यात आला होता परंतु त्या चौकशी अहवालावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला ही कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे आखरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे पंधरा दिवस अन्न त्याग उपोषण केल्यामुळे गटविकास अधिकारी तेल्हारा यांनी ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथे अनियमीतता झाल्याबाबत
यांच्या विरूद्ध


सीमा संजय अढाऊ सरपंच व एस एल सोनवणे सचिव यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958नुसार 39/1 प्रकरण पुढील कारवाई करिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला व विभागीय आयुक्त तपासनी अमरावती यांचे कडे प्रस्ताव दाखल करण्यात आला व विस्तार अधिकारी पचायत तेल्हारा यांनी ग्राम पंचायत माळेगांव बाजार दप्तराची तपासणी ही न केल्यामुळे झालेल्या अनियमित्ततेला जवाबदार असून कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जि प अकोला यांनी विस्तार अधिकारी पचायत यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश हे गटविकास अधिकारी तेल्हारा यांना दि 27,10,2025 रोजी देण्यात आले आहेत






