शेगाव – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९ मध्ये भारतीय जनता पार्टीची (भाजप) जोरदार हवा निर्माण झाली असून मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात कमळाकडे झुकलेला दिसत आहे. घराघरातील भेटीगाठी, बूथस्तरावरची जोरदार संघटना आणि युवकांचा वाढता पाठिंबा यामुळे भाजपच्या पॅनलला प्रभागात मजबूत गती मिळाली आहे.
स्थानिक कार्यकर्ते, महिला मोर्चा तसेच युवा मोर्चा यांच्या संयुक्त मोहिमेमुळे भाजपचा जनसंपर्क मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक प्रश्नांवर जलद निर्णय, विकासकामांसाठी मिळणारा निधी आणि केंद्र–राज्य सरकारची लोकप्रिय धोरणे यामुळे प्रभागातील मतदार भाजपकडे विश्वासाने पाहत असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग ९ मधील अनेक मतदारांनी संवादात सांगितले की, “या वेळेस विकास आणि स्थिर नेतृत्वाला प्राधान्य आहे. त्यामुळे भाजपचाच पर्याय योग्य वाटतो.” दुसरीकडे, विरोधकांचे अंतर्गत मतभेद आणि कमकुवत संघटनाही भाजपला फायद्याची ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगितले जात आहे.
निवडणुकीचे वातावरण तापत असताना प्रभाग ९ मध्ये भाजपची ‘फुल टॉस हवा’ असल्याचे स्पष्टपणे जाणवत असून आगामी दिवसांत ही हवा आणखी मजबूत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





