Home Breaking News प्रहार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे अन्नत्याग...

प्रहार तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे अन्नत्याग उपोषणास प्रारंभ

183
0

प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे दी, 16,10,2025, पासुन अन्नत्याग उपोषणास सुरूवात उपोषनातील मागण्या 1,ग्रामपंचायत माळेगाव बाजार येथील 14 वा वित्त आयोग व पंधरावा वित्त आयोग मध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटूनही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडून कारवाई होत नाही कारवाई होणे बाबत 2,/,2024 व 2025 यावर्षी काढण्यात आलेल्या हद्दपारचे मूळ दस्तावेज तपासून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी तसेच 2024 मधल्या हद्दपारच्या प्रस्तावामध्ये माननीय उपविभागीय अधिकारी अकोट यांनी 101 ,2013 व 101 ,2023 हे दोन्ही गुन्हे दुसऱ्याचे नावाने असल्यावर सुद्धा ज्ञानेश्वर आखरे यांच्या नावावर नोंदवून हद्दपारी ही हेतू परस्पर काढण्यात आली होती त्या संपूर्ण हद्दपारची चौकशी करण्यात यावी 3, तेलारा पोलीस स्टेशन येथे ग्रामपंचायत माळेगाव बाजार सरपंच पती व अन्य दोन व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून सुद्धा एका वर्षात ज्ञानेश्वर आखरे यांची दोन वेळा हद्दपारी ही एकतर्फी कारवाई करून काढण्यात आली आहे व गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची हद्दपरी काढण्यात यावी असे निवेदनात नमूद असून निवेदन हे माननीय विभागीय आयुक्त साहेब अमरावती यांना देण्यात आले आहे.