Home Breaking News माळेगांव बाजार ग्रामपंचायत प्रकरण: सरपंच-सचिवाविरुद्ध कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

माळेगांव बाजार ग्रामपंचायत प्रकरण: सरपंच-सचिवाविरुद्ध कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

381
0
अकोला/अमरावती, दि. ३० सप्टेंबर २०२५ – माळेगांव बाजार ग्रामपंचायतच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील अनियमिततेविरोधात तालुक्याचे प्रहार अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हे प्रकरण गटविकास अधिकारी तेल्हारा यांच्या चौकशी अहवालानुसार उघडकीस आले आहे. अहवालात नमूद आहे की, सरपंच-सचिव यांनी कर्तव्याचे पालन न केलेले, मुळ दस्तऐवजांमध्ये खोड तोड (उपरिलेखन) केलेले असून, खरेदी केलेले साहित्य शासन निर्णय 1.12.2016 नुसार JEM पोर्टलवरून खरेदी केलेले नाही, असेही सिद्ध झाले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांनी महिनाभराचा ऐक महिण्याचा कालावधी उलटूनही सरपंच-सचिवांवर आवश्यक ती कार्यवाही न केल्याने आणि अनियमिततेसाठी जबाबदार गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत तेल्हारा यांच्यावरही कारवाई न केल्याने आखरे यांनी गंभीर निर्णय घेतला आहे.
पूर्वीही दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी जिलाधिकारी कार्यालय, अकोला येथे आत्मदहनाचा अर्ज केला होता. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अकोट यांनी अंतर्गत कारवाईसाठी अकोला जिल्हा हद्दीत येण्यास परवानगी न देणे या कारणास्तव अर्ज नामंजूर केला. या परिस्थितीमुळे अखेर २५ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे आत्मदहनाचा इशारा दिला.
ज्ञानेश्वर आखरे म्हणतात की, “सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनियमिततेला मोकळीक मिळू नये. भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी तातडीने योग्य ती कारवाई व्हावी.” हे प्रकरण स्थानिक प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारीची परीक्षा समोर आणत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा घटनांमुळे स्थानिक सरकारी यंत्रणांमध्ये सुधारणा आणि प्रभावी कार्यवाहीची आवश्यकता अधिक स्पष्ट होते.