हिंजवडी आयटी पार्क, चाकण-तळेगाव-माळुंगे औद्योगिक पट्टा तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. आता या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला ‘सिंगल पॉइंट कोऑर्डिनेटर’ म्हणून नेमण्यात आले आहे.
ही जबाबदारी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार यांनी दिली असून, महत्त्वाची बाब म्हणजे या उच्चस्तरीय बैठकीस भोसरीचे आमदार महेश लांडगे दादा उपस्थित होते. त्यांनी वाहतूक समस्येवर भरभरून मत व्यक्त करत स्पष्टपणे सांगितले की, “उद्योगस्नेही वातावरण हवे असेल तर वाहतूक व्यवस्थापन हे प्राधान्याने सोडवावे लागेल.”
या बैठकीत मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले:
PMRDA कडे सर्व यंत्रणांचा समन्वय राखण्याची जबाबदारी.
भूसंपादनासाठी निधीसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा.
नाशिक फाटा ते चाकण ८ पदरी महामार्गाच्या कामाला वेग देणे.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर DP रोड ३० मीटर रुंद करण्याचा निर्णय.
एनएचएआयकडून अतिरिक्त रुंदीकरणाचा प्रस्ताव.
२०५ भूमिपुत्रांच्या जमिनीचे तत्काळ संपादन आणि हस्तांतर.
चाकण चौकात इलेक्ट्रॉनिक टोल स्थलांतर सुरु.
अंबेधन चौकातील पोल स्थलांतर ३० दिवसात पूर्ण करणार.
मोई ते चिखली दरम्यान पूल व रुंदीकरणाच्या कामाची मागणी.
महत्त्वाच्या चौकांचे रुंदीकरण – चाकण असोसिएशनची मागणी.
मोठ्या ट्रक पार्किंगवर कडक कारवाईचे आदेश.
उलट दिशेतील व चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंगवर कारवाई.
HPCL चौकात टँकर वाहतुकीवर निर्बंध.
गायरान व भांडारा टेकडी जमीन MIDC कडे देऊन ट्रक टर्मिनस उभारणार.
हिंजवडी व चाकणसाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन होणार.
‘सरथी’सारखी मोबाईल अॅप प्रणाली पुणे जिल्ह्यात लागू.
चार्होळी पुलाजवळ १८ मीटर रुंदीचा कनेक्टिंग रस्ता व इंद्रायणी नदीवर १२ मीटर रुंदीचा पूल – PMRDA कडून मागणी.
महेश लांडगे दादांची भोसरी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण उपस्थिती ही औद्योगिक विकासाच्या आणि वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरली. त्यांनी सडेतोडपणे सांगितले की, “औद्योगिक वसाहती, आयटी कंपन्या आणि रहिवासी भागाला जोडणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता आणि वहन क्षमता वाढवली पाहिजे, अन्यथा विकासाचा गतीमान प्रवास अडचणीत येईल.”