Home Breaking News स्वरांजली कला क्रीडा मंचचे संपादकीय अध्यक्ष प्रकाश भाऊ डोळस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा...

स्वरांजली कला क्रीडा मंचचे संपादकीय अध्यक्ष प्रकाश भाऊ डोळस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव – गायक, वादक आणि जिव्हाळ्याचा कलावंत

178
0
भोसरी : स्वरांजली कला क्रीडा मंच चे संपादकीय अध्यक्ष, उत्कृष्ट गायक, वादक आणि कलाक्षेत्रातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आयुष्यमान यशवंत उर्फ प्रकाश भाऊ डोळस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
प्रकाशभाऊ डोळस हे केवळ एक उत्तम कलाकारच नाहीत, तर अतिशय शांत, मनमिळाऊ, दिलदार आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्व आहेत. संगीत आणि कलेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अनेक तरुणांना दिशा दाखवली असून, त्यांच्या सहवासात प्रत्येकाला एक नवीन ऊर्जा मिळते.
वाढदिवसाच्या निमित्ताने स्वरांजली परिवार आणि विविध सांस्कृतिक मंडळांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. शुभेच्छुकांनी त्यांच्या दीर्घायुष्याबरोबरच, संगीत आणि कलाक्षेत्रातील त्यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत राहो, अशी प्रार्थना केली.
यावेळी शुभेच्छा देताना आयुष्यमान देवानंद अंभोरे म्हणाले की, “प्रकाश भाऊ डोळस हे खरे अर्थाने लोककलावंत आहेत. त्यांचे गाणे, वादन आणि व्यक्तिमत्व हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना कलेतून आयुष्य घडवण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी झटणाऱ्या प्रकाशभाऊंच्या कार्याचा ठसा संगीत, समाजकार्य आणि क्रीडा क्षेत्रात उमटला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, पुढील काळातही ते अशाच ऊर्जेने कार्यरत राहोत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.