नागपूरजवळील रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अभिनव भारती परिसरात आज एक ऐतिहासिक सोहळा पार पडला.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावे तीन महत्वपूर्ण प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले.
या भव्य समारंभात अंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवन, अंतरराष्ट्रीय गुरुकुलम्, तसेच मुला-मुलींसाठी वसतीगृह उभारण्यात येणार असून, हे संपूर्ण प्रकल्प आधुनिक संस्कृत शिक्षण, भारतीय परंपरा व गुरुकुल परंपरेला चालना देणारे ठरणार आहेत.
🔸 यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कुलगुरु आचार्य हरेराम त्रिपाठी, तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती. हा समारंभ म्हणजे आधुनिक भारतात संस्कृत शिक्षण आणि भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक मानले जात आहे.