Home Breaking News पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन साकारतेय; आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी व्हीजनचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन साकारतेय; आमदार महेश लांडगे यांच्या भोसरी व्हीजनचा मोठा टप्पा पूर्णतेकडे

110
0
पिंपरी-चिंचवड, २ जुलै २०२५: भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार व्हावा, नागरिकांना संविधानाचे महत्त्व समजावे आणि युवकांनी जगभरातील लोकशाही प्रक्रियेचा सखोल अभ्यास करावा, यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘संविधान भवन’ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला महानगरपालिका स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
या भव्य प्रकल्पाचे प्रारंभिक स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनी 2017 मध्ये घेतलेल्या ‘भोसरी व्हीजन-2020’ या उपक्रमात पाहिले होते. या उपक्रमांतर्गत संविधान भवन व आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी उभारण्याचा निश्चय त्यांनी केला होता.
महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात हा प्रकल्प थांबला होता, मात्र 2022 मध्ये महायुती सत्तेवर आल्यानंतर 2023 मध्ये पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सुमारे 120 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
संविधान भवन प्रकल्प पेठ क्र. ११, जागा क्र. २ क्षेत्र २५८९४.२० चौ. मीटर जागेवर उभारला जात आहे.
या भवनात – तळमजल्यावर ४ प्रदर्शना हॉल आणि ३०० आसन क्षमतेचे ऑडिटोरियम, पहिल्या मजल्यावर ४ आधुनिक ग्रंथालय हॉल, बेसमेंटमध्ये ३५० चारचाकी व १,००० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय याशिवाय माहिती तंत्रज्ञानयुक्त सुविधा, डिजिटल भारतदर्शन, शैक्षणिक प्रकल्पांचे सादरीकरण, आणि संविधान शिक्षणासाठी खास लॅबही असणार आहेत.
प्रकल्पासाठी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारकडून ५० कोटी रुपये व राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाकडून १५ कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे. हे अनुदान मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पार पाडली जात आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. संविधान भवन हे फक्त एक इमारत नसून, ती एक वैचारिक प्रेरणा केंद्र असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्य वैशिष्ट्ये :
महाराष्ट्रातील पहिले आणि ऐतिहासिक संविधान भवन
भारतीय राज्यघटनेच्या प्रचारासाठी केंद्रबिंदू ठरणार
अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी खुली जागा
राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांसाठी आधुनिक सुविधा
राजकीय इच्छाशक्ती आणि दूरदृष्टीचे प्रतिक