लोणावळा | २१ जून २०२५ :- ‘११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन’ लोणावळ्यातील आयुर्वेद शिक्षण व संशोधन संस्थेच्या केव्हल्याधाम योगसंस्थेत “योग संमेलन” या भव्य उपक्रमाने साजरा करण्यात आला. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला सकाळी ६.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन संदेश पाठवून सुरुवात झाली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रतिनिधी म्हणून वरिष्ठ आय.ए.एस. अधिकारी डॉ. मुनील फुलारी, ब्रिगेडियर सुशील धर्माधिकारी, पुण्याचे पोलीस आयुक्त रंजीत सिंह देओल, लायन्स क्लब, केव्हल्याधाम संस्थेचे सचिव, शिक्षक, संशोधक, नागरिक, विद्यार्थी आणि पोलीस दल सहभागी झाले होते.
या योग दिनानिमित्त विविध सत्रांमध्ये योगासने, ध्यानधारणा, प्रात्यक्षिके, ‘योग: एक पृथ्वी, एक आरोग्य’ या घोषवाक्याचा प्रसार करण्यात आला. पोलीसांसाठी खास लिहिलेल्या “योगामय पोलीस” या ग्रंथाचे प्रकाशनही झाले. यामध्ये पोलीस दलासाठी मानसिक व शारीरिक आरोग्य टिकवण्यासाठी योगाची दिशा दाखवली आहे.
कार्यक्रमात केव्हल्याधामच्या कुंडलिनी सभागृहात पोलीस दलासाठी खास सेशन्स घेण्यात आले. पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना योगाचा लाभ मिळावा, या हेतूने उपक्रम हाती घेण्यात आला.
🔹 सन्मान समारंभ: डॉ. मुनील फुलारी यांना “प्रतिष्ठित सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५” देऊन गौरवण्यात आले.
🔹 सहभागी संस्था व ठिकाणे:
ऑर्डनन्स फॅक्टरी, देहूरोड
The Great Eastern Academy, Lonavla
L&T ट्रेनिंग सेंटर, लोणावळा
पोलीस ट्रेनिंग स्कूल, खंडाळा
INS शिवाजी, नौदल तळ, लोणावळा
केव्हल्याधाम विद्याशाखा
टाटा पॉवर, लोणावळा
खोपोली पॉवर हाउस
बिरला रिसॉर्ट, लोणावळा
फरीस्ता रिसॉर्ट, लोणावळा
योग दिनानिमित्त ‘Philosophy of Yoga’ या ग्रंथाचाही प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन योग शिक्षक जितेंद्र सिंगल यांनी केले.
एकात्म आरोग्याच्या दिशेने लोणावळ्यातून नवा संदेश!
योग हे केवळ आसने नव्हे, तर जीवनशैलीचा भाग असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले. “योगा फॉर वन अर्थ, वन हेल्थ” या घोषवाक्यातून संपूर्ण मानवजातीसाठी आरोग्यदायी जीवनाचा संदेश देण्यात आला.