Home Breaking News मोका गुन्ह्यातील आरोपी स्वारगेट एस.टी. स्टँडवरून जेरबंद – गुन्हे शाखा युनिट-३ ची...

मोका गुन्ह्यातील आरोपी स्वारगेट एस.टी. स्टँडवरून जेरबंद – गुन्हे शाखा युनिट-३ ची यशस्वी कामगिरी

49
0
पुणे | ६ जून २०२५ – पुण्यातील गुन्हेगारी जगतात खळबळ माजवणाऱ्या मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्ह्यातील आरोपी रोहन राजेश धिवार (वय २२, रा. वडगाव धायरी) याला अखेर स्वारगेट एसटी स्टँड जवळून पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३ च्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे केली असून, ही एक मोठी पोलिस यशोगाथा ठरली आहे.

कोण आहे आरोपी आणि काय गुन्हा?
रोहन धिवार याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४२४/२०२४ अन्वये विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९, १११, १५१(३), १८९(१)(२)(४), १९०, १९१(३), ३(५) तसेच आर्म्स अॅक्ट कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट ७ आणि विशेषतः महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ चे कलम ३(१), ३(२), ३(४) अंतर्गत गुन्हे नोंद आहेत.
 अटक कारवाईचा तपशील
दि. ४ जून २०२५ रोजी पोलीस अंमलदार अमित बोडरे आणि चेतन शिरोळकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरोपी रोहन धिवार स्वारगेट एसटी स्टँडजवळ आला आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. अटकेनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून वैद्यकीय तपासणी करून त्याला वारजे माळवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
 पोलिसांची शिस्तबद्ध कामगिरी
ही यशस्वी अटक मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे – १) श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत सहभागी अधिकारी आणि अंमलदार:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक – रंगराव पवार
सहायक पोलीस निरीक्षक – ज्ञानेश्वर ढवळे
परि. पो. उपनिरीक्षक – स्वप्नील हंस, सुरेश पाटील
पोलीस अंमलदार – पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, किशोर दुशिंग, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे
चालक – सुजीत पवार
 गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे कडक पाऊल
मोक्का अंतर्गत गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणवण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. रोहन धिवार याची अटक ही अशाच एका मोठ्या नेटवर्कवर पोलिसांनी घातलेली लगाम मानली जात आहे.
 पोलिसांचे नागरिकांना आवाहन
“शहरात कोणतीही संशयास्पद हालचाल, टोळी कारवाया किंवा शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.” – गुन्हे शाखा