पुणे | प्रतिनिधी :- पावसाळा सुरू होताच लोणावळा आणि मावळ तालुका हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनते. धबधबे, प्राचीन लेण्या, ऐतिहासिक किल्ले, पवना धरण परिसर आणि निसर्गसौंदर्य यामुळे येथे हजारो पर्यटक गर्दी करतात. मात्र, या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत कलम १६३ नुसार जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
प्रतिबंधित स्थळांची यादी:
एकविरा देवी मंदिर
कार्ला लेणी, भाजे लेणी
भाजे धबधबा
लोहगड किल्ला
विसापूर किल्ला
तिकोणा किल्ला
टायगर पॉईंट
लायन्स पॉईंट
पवना धरण परिसर
शिवलिंग पॉईंट
या गोष्टींवर संपूर्ण बंदी:
वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, पोहणे
धबधब्यांच्या खाली जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहात बसणे
धोकादायक ठिकाणी सेल्फी, व्हिडिओ शूटिंग करणे
मद्यपान, विक्री, वाहतूक, मद्य बाळगणे
स्पीकर, डीजे, वूफर यांद्वारे ध्वनी प्रदूषण
सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता, टवाळखोरी, महिलांशी गैरवर्तन
प्लास्टिक, थर्माकोल, कचरा टाकणे
धोकादायक ठिकाणी वाहन उभी करणे
धरण, नद्या, धबधबा परिसरात वाहन प्रवेशबंदी (फक्त अत्यावश्यक सेवा वगळता)