दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात असतानाच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घटनास्थितीचा आढावा घेत जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
खासदार शिंदे म्हणाले,”आज सकाळी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृत नागरिकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
ते पुढे म्हणाले, “या अपघातात जखमी झालेल्या नागरिकांवर कळवा व ठाणे येथील रुग्णालयांमध्ये तात्काळ उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे.”
याच दरम्यान डॉ. शिंदे यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तातडीने आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले.
महत्त्वाचे मुद्दे:
मृतांना श्रद्धांजली आणि कुटुंबीयांना सांत्वन
जखमींवर तत्काळ उपचार सुरू
रुग्णालय प्रशासनास दिले तातडीचे उपचाराचे आदेश
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेला अपघात का? यावर संताप व्यक्त
मागणी:
या दुर्घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकलमध्ये होणारी गर्दी, अपुरी सुविधा आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना याकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.