Home Breaking News ठाकरेंचा पैलवान अखेर शिंदेंच्या आखाड्यात! चंद्रहार पाटील यांचा नाट्यमय प्रवेश, सांगलीच्या राजकारणात...

ठाकरेंचा पैलवान अखेर शिंदेंच्या आखाड्यात! चंद्रहार पाटील यांचा नाट्यमय प्रवेश, सांगलीच्या राजकारणात खळबळ

79
0
 १० जून २०२५ :- राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारी घटना घडली आहे. डबल महाराष्ट्र केसरी विजेते आणि शिवसेना (ठाकरे गट) चे आघाडीचे नेते पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात सोमवारी रात्री हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
🔸 शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश

पैलवान चंद्रहार पाटील यांनी शेकडो निष्ठावान कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणं पूर्णपणे ढवळून निघण्याची शक्यता आहे.

“आता खऱ्या आखाड्यात आलो!” — एकनाथ शिंदेंचा टोला
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हणाले, “आपण आता नकली आखाड्यातून खऱ्या आखाड्यात आलात. खेळाडूंना न्याय देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात योगदान देण्यासाठी ही योग्य जागा आहे.”
सांगलीच्या घराणेशाहीवर सडकून टीका
चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंचा हात सोडताना सांगली जिल्ह्यातील घराणेशाहीवर सडकून टीका केली.
“सांगली जिल्ह्याला घराणेशाहीची कीड लागली आहे. मी कुठलेही पद मागितले नाही. मातीतील खेळाला न्याय मिळावा म्हणून शिंदे गटात प्रवेश केला आहे,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी मत मांडले.
राजकारणातील उतार-चढावांची साक्ष
🔹 मातोश्रीवरून संसदेला झेप घेणारे चंद्रहार पाटील… आता शिंदे गटात
🔹 महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नांचा फोल ठरलेला प्रवास
🔹 राजकीय गुरू अनिल बाबर यांचा उल्लेख, तर महाविकास आघाडीवर ताशेरे
ठाकरे गटासाठी मोठा धक्का!
चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेना (ठाकरे गट) च्या संघटनेवर मोठा परिणाम होणार हे निश्चित आहे.
🔸 याआधीही संजय विभूते, ऋषिकेश पाटील, सिद्धार्थ जाधव यांसारख्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
🔸 आता पैलवान पाटील यांचा प्रवेश हा आणखी एक राजकीय चमत्कार ठरणार आहे.
ठाकरेंची ताकद व्यर्थ गेली?
मागील लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी स्वतः मैदानात उतरून ताकद लावली होती. काँग्रेसला माघार घ्यायला लावून पाटलांना उमेदवारी मिळवून दिली होती. पण त्यावेळी पाटील पराभूत झाले आणि विशाल पाटील खासदार झाले.