नवी दिल्ली – भारतीय प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी! भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) IPL 2025 च्या उर्वरित सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक अखेर जाहीर केले आहे. १७ मेपासून देशभरात पुन्हा एकदा आयपीएलचा थरार सुरू होणार असून अंतिम सामना ३ जून रोजी खेळवला जाणार आहे. देशभरातील सहा प्रमुख मैदानांवर एकूण १७ सामने खेळवले जातील.
या निर्णयामुळे लाखो क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. बीसीसीआयने यावेळी भारतीय सशस्त्र दलांचे विशेष आभार मानले असून त्यांच्या पराक्रमामुळेच आयपीएलची सुरक्षित पुनर्रचना शक्य झाली असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
क्रिकेटचा उत्सव पुन्हा साजरा होणार!
पूर्वी ५८ सामने पूर्ण झाले होते, मात्र तणावाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा थांबवण्यात आली होती. धर्मशाला येथील पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अपूर्ण राहिला होता. हा सामना २४ मे रोजी जयपूर येथे पुन्हा खेळवला जाणार आहे.
नवीन वेळापत्रकात दोन डबल हेडर सामन्यांचा समावेश
सहाव्या आठवड्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये बेंगळुरू, जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये सामने पार पडतील.
डबल हेडर सामन्यांमध्ये एकाच दिवशी दोन सामने रंगणार आहेत:
१८ मे :
दुपारी: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज, जयपूर / संध्याकाळी: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, दिल्ली
२५ मे :
दुपारी: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद / संध्याकाळी: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली