पुणे | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता या प्रकरणाचा थेट संबंध चोंधे कुटुंबाशीही असल्याचं स्पष्ट झालं आहे. सुयश चोंधे आणि त्याचा भाऊ संकेत चोंधे यांनी हगवणे बाप-लेकाला फरार होण्यासाठी मदत केली होती. एवढंच नव्हे, तर चोंधे कुटुंबाविरोधातही त्यांच्या सुना त्रास, छळ, मारहाण, ब्लू फिल्म दाखवणे, काळी जादू आणि गांजा सेवन यांसारख्या गंभीर आरोपांचं सनसनाटी वादळ उठलं आहे.
हगवणे प्रकरणात चोंधे कुटुंबाचा थेट सहभाग
वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे थार गाडीने फरार झाले होते. ही थार गाडी संकेत चोंधेच्या नावावर असल्याचे तपासात उघड झाले आहे. संकेत चोंधे व त्याचा भाऊ सुयश चोंधे यांनी हगवणे बाप-लेकाला पळून जाण्यास मदत केल्याची कबुली मिळाली आहे.
चोंधे कुटुंबावर गंभीर आरोपांची मालिका
-
सुयश चोंधे – पत्नीवर ब्लू फिल्म दाखवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडणे, सासूसमोर गांजा सेवन करणे, धमक्या देणे.
-
संकेत चोंधे – पत्नीवर मारहाण, पैशांची मागणी, काळी जादूचा संशय, हुंडाबळ.
-
सासू वैशाली व सासरे नरेश चोंधे – सुनांवर अत्याचार, मानसिक छळ, हुंडाबळीसारखे वर्तन.
-
कुटुंबीयांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी व महिला आयोगाकडे नोंदवलेली माहिती असूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याचा आरोप.