माहे एप्रिल २०२५ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासन अधिकारी श्रद्धा बोरडे, मुख्याध्यापक सुनंदा मगर, वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक सुजाता भोसले, लेखापाल मधुकर सानप, सिस्टर इनचार्ज अनिता आगवणे, उपशिक्षक संजिवनी राऊत, स्टाफ नर्स माधुरी यादव, रखवालदार अनिल घाडगे, शिपाई रफिक सुतार, मजूर गोवर्धन दखनेजा, सुनील काळे, किरण जगदाळे, सफाई कामगार मंदा जाधव, सफाई सेवक शांताराम मेंगळे यांचा समावेश आहे.
तर स्वेछानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये स्टाफ नर्स मिनाक्षी आढाव, सफाई कामगार पारूबाई काळोखे, मिना जाधव, चंद्रकांत जगताप, संगिता कांबळे, सफाई सेवक लख्खन पुनमचंद, जयप्रकाश जाधव, तानाजी सनके, गटरकुली जंगल गोठे, सफाई कामगार दत्तात्रय हाटकर यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.