नागपूर | प्रतिनिधी — शहरातील नवीन कामठी परिसरात एका फार्महाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने (AHTU) धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी प्रसिद्ध बिल्डर सुनील अग्रवालसह चार जणांना अटक केली, तर मुंबईहून खास बोलावण्यात आलेल्या चार तरुणींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून, अमली पदार्थ पुरवठा साखळीचा तपासही सुरू करण्यात आला आहे.
फार्महाऊसवर अमली पार्टीचे आयोजन
गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, शनिवारच्या रात्री (सॅटरडे नाइट) ‘एस फार्म’ नावाच्या फार्महाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर मध्यरात्री १ वाजता छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी या छाप्यात 1.31 ग्रॅम एमडी (मेथेड्रॉन), दारूच्या बाटल्या, हुक्क्याचे साहित्य, सहा मोबाइल फोन, दोन कारसह एकूण २६ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी:
-
सुनील शंकरलाल अग्रवाल (वय ६१, रा. रामलक्ष्मी कॉलनी, कामठी) – बिल्डर
-
गौतम सुशील जैन (वय ५१, रा. रामदासपेठ)
-
नीलेश बाबुलाल गडिया (वय ६१, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ)
-
मितेश मोहनलाल खक्कर (वय ४८, रा. कमल पॅलेस, रामदासपेठ)