Home Breaking News डॉ. श्रीकांत शिंदे यांचा यूएई दौरा यशस्वी; दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेला यूएईने दिला...

डॉ. श्रीकांत शिंदे यांचा यूएई दौरा यशस्वी; दहशतवादाविरोधातील भारताच्या भूमिकेला यूएईने दिला ठाम पाठिंबा!

54
0

संयुक्त अरब अमिराती (UAE) दौऱ्याची यशस्वी सांगता करताना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने यूएईच्या नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. भारताच्या दहशतवादाविरोधातील निर्णायक भूमिकेसाठी यूएईने दाखवलेला ठाम पाठिंबा आणि आपुलकीपूर्ण आतिथ्य याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.

दौऱ्यात भारतीय समुदायासोबत झालेल्या संवादात अनेकांनी सीमापार दहशतवादामुळे उद्भवणाऱ्या त्रासाबाबत आपली व्यथा मांडली. यावर भारत सरकारने मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली घेतलेल्या कठोर आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. यूएईमधील भारतीय समुदाय हे भारताचे जागतिक स्तरावरील खरे राजदूत असून, त्यांच्यामार्फत भारताची प्रतिमा सातत्याने उंचावली जात आहे.

भारत आणि यूएईमधील मैत्रीपूर्ण संबंध गेल्या अनेक दशकांपासून अर्थव्यवस्था, लोकसांख्यिक संबंध आणि जागतिक सहकार्याच्या पातळीवर बळकट झाले आहेत. भारताला यूएईमध्ये मोठे सद्भाव आणि आदर प्राप्त असून, हा दौरा या संबंधांना अधिक सुदृढ करणार असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

विशेष आभार व्यक्त करण्यात आलेले यूएईतील नेते:

मान. शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान, सहिष्णुता आणि सहजीवन मंत्री

डॉ. अली राशिद अल नुऐमी, संरक्षण समितीचे अध्यक्ष

भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकारी ज्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले:

मा. श्री संजय सुधीर, भारताचे अबूधाबीतील राजदूत

श्री. अमरनाथ, डेप्युटी चिफ ऑफ मिशन

श्री. सतीश कुमार शिवन, भारताचे वाणिज्यदूत, दुबई

कौतुकास्पद अधिकारी: आयएफएस अधिकारी सौ. आयुषी सुतारिया

या दौऱ्यात मा. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे आणि परराष्ट्र मंत्रालयाचे (@MEAIndia) मार्गदर्शन व सहकार्य अमूल्य ठरल्याचे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

संयुक्त अरब अमिराती दौऱ्यानंतर भारतीय शिष्टमंडळ पुढील टप्प्यासाठी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (DRC) कडे प्रस्थान करत आहे. हा दौरा भारताच्या जागतिक स्तरावरील दहशतवादविरोधी मिशनचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे.