पुणे (३१ मे २०२५) – शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य आधार असलेल्या PMPML बसमध्ये पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीची घटना घडली आहे. दि. २७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ते ५.३० च्या सुमारास स्वारगेट बस डेपो ते पर्णकुटी चौक दरम्यान प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेला आपली सोन्याची चैन गमवावी लागली. सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फिर्यादी – ६७ वर्षीय महिला, रा. आळंदी देवाची, पुणे या PMPML बसने प्रवास करत होत्या. यावेळी बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत सुशांत शंकर गायकवाड (वय २४, रा. साईनाथ नगर, खराडी) या तरुणाने त्यांच्या गळ्यातील ₹१,२५,०००/- किंमतीची सोन्याची चैन चोरून नेली.
पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून काही तासांतच आरोपीला अटक केली असून, येरवडा पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक ३५३/२०२५, भारतीय दंड विधान कलम ३०५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुर्वे (मो. ८६०५३३३४३३) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली सोनसाखळी जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
🔹 महत्वाचे मुद्दे :
-
बसमधील गर्दीचा वापर करून चोरी
-
६७ वर्षीय महिलेच्या गळ्यातून चैन लांबवली
-
₹१.२५ लाख किमतीचे नुकसान
-
तात्काळ पोलिस कारवाईत आरोपी अटकेत
-
PMPML प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह