Home Breaking News ई-क्युजे प्रणालीचे लोकार्पण – सहकार विभागाची अर्धन्यायिक प्रक्रिया आता अधिक जलद, पारदर्शक...

ई-क्युजे प्रणालीचे लोकार्पण – सहकार विभागाची अर्धन्यायिक प्रक्रिया आता अधिक जलद, पारदर्शक आणि ऑनलाईन! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

84
0

मुंबई | राज्यातील सहकारी संस्थांशी संबंधित प्रकरणांवर आता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने निर्णयप्रक्रिया पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहकार विभागाच्या ई-क्युजे (e-Quasi-Judicial) प्रणालीचे आज मंत्रिमंडळ बैठकीत लोकार्पण करण्यात आले.

ई-क्युजे प्रणाली म्हणजे काय?

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील २.२५ लाख सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत कार्यरत आहेत. यामुळे विविध अर्धन्यायिक प्रक्रियांचा सामना नागरिकांना करावा लागतो. ई-क्युजे प्रणालीमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन, पारदर्शक व जलद होणार आहे.

मुख्य वैशिष्ट्ये – PRATYAY प्रणाली अंतर्गत कागदविरहित प्रक्रिया

PRATYAY (Paperless Revision and Appeal in Transparent Way) अंतर्गत आता नागरिकांना पुढील सुविधा मिळणार:

वकील/संस्था/व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी

प्रकरणे ऑनलाईन दाखल व त्यांची छाननी

त्रुटी भरपाईची ऑनलाईन सोय

सुनावणीच्या तारखा, वेळा व नोटीसा ई-मेलद्वारे

बोर्ड व रोजनामा ऑनलाईन उपलब्ध

अंतिम निर्णय ई-मेलद्वारे पाठविला जाणार

 

प्रथम टप्प्यात उपलब्ध सेवा

मानीव अभिहस्तांतरण (Deemed Conveyance)

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत अर्ज, अपील, पुनर्विचार अर्ज

महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत अवैध सावकारीविरोधातील तक्रारी


दुसऱ्या टप्प्यात येणार महत्त्वाच्या सुविधा

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी

ई-टपालद्वारे नोटीस बजावणी

 

उपस्थित मान्यवर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, आयुक्त दीपक तावरे यांचीही उपस्थिती यावेळी होती.