राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पुण्यातील गाजलेल्या २०२३ च्या IED (इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइसेस) प्रकरणात मोठं यश मिळवलं आहे. बंदीघातलेल्या आयएसआयएस (ISIS) दहशतवादी संघटनेच्या झोपलेल्या गटातील (Sleeper Cell) दोन मुख्य फरार संशयितांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. हे दोघं इंडोनेशियाच्या जकार्ता शहरातून भारतात परत येत असताना पकडले गेले.
कोण आहेत अटक झालेले अतिरेकी?
अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं असून, हे दोघंही पुण्याच्या कोंढवा परिसरातील रहिवासी आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशनने मुंबई विमानतळावर त्यांना रोखल्यानंतर एनआयएने त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली.
काय आहे प्रकरण?
या दोघांसह इतर आठ आरोपींनी मिळून देशात दहशत पसरवण्यासाठी आयएसआयएसच्या विचारसरणीला अनुसरून देशविरोधी कट रचल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांनी पुण्यात कोंढवा भागात एका घरात बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र चालवलं होतं. तसंच त्यांनी IED चाचणीसाठी नियंत्रित स्फोट (controlled explosion) सुद्धा केला होता.
उद्देश काय होता?
NIA च्या अधिकृत निवेदनानुसार, या आरोपींचा उद्देश होता:
-
भारतात सामाजिक सलोखा बिघडवणे
-
सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे
-
हिंसा आणि दहशतीच्या माध्यमातून इस्लामिक राज्य स्थापणे
आधीच चार्जशीट दाखल
या प्रकरणात आधीच १० आरोपींविरुद्ध UAPA, स्फोटके कायदा, शस्त्र कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेले अब्दुल्ला आणि तल्हा यांच्यावर NIA विशेष न्यायालयाकडून नॉन-बेलेबल वॉरंट्सही जारी करण्यात आले होते.
इनाम घोषित
NIA ने या फरार आरोपींच्या अटकेसाठी ३ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अखेर तब्बल दोन वर्षांच्या शोधानंतर ही कारवाई यशस्वी ठरली.
इतर आरोपी कोण?
या प्रकरणात अटक झालेल्या इतर संशयितांमध्ये हे नावं समाविष्ट आहेत:
-
मोहम्मद इम्रान खान
-
मोहम्मद युनूस साकी
-
अब्दुल कादिर पठाण
-
सिमाब नासिरुद्दीन काझी
-
झुल्फिकार अली बरोडवाला
-
शमिल नाचन
-
अकीफ नाचन
-
शहनवाज आलम