लोणावळा – निसर्गरम्य लोणावळा नगरीत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रोत्यांना विचारांचा मनमुराद आनंद देणारी ‘वसंत व्याख्यानमाला’ २१ एप्रिल २०२५ पासून सुरु होत आहे. गेल्या २२ वर्षांपासून श्रोत्यांच्या मनामनात अधिराज्य गाजवणारी ही व्याख्यानमाला यंदा २३व्या वर्षात पदार्पण करत असून, सलग सात दिवस विविध विषयांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.
ही व्याख्यानमाला २००३ साली स्व. प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रेरणेतून सुरु झाली होती. त्यानंतर ही मालिका लोणावळा व परिसरात एक वैचारिक आणि सांस्कृतिक उत्सव ठरली आहे. वसंत व्याख्यानमाला समितीच्या सौ. राधिकाताई भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली यंदाही ही मालिका अधिक भव्यतेने संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा:
🔹 २१ एप्रिल – ‘मधुराणीचा जीवनपट’ या विषयावर सुप्रसिद्ध अभिनेत्री सौ. मधुराणी गोखले प्रभुलकर यांची प्रकट मुलाखत – मुलाखतकार: कु. अनघाताई मोडक
🔹 २२ एप्रिल – ‘संत मीराबाई’ या आध्यात्मिक व प्रेरणादायी विषयावर प्रा. मॅक्सवेल लोपेस, वसई यांचे व्याख्यान
🔹 २३ एप्रिल – ‘मला भेटलेली माणसे’ – वैयक्तिक अनुभवांवर आधारित विचारमंथन डॉ. नितीन आरेकर यांचे
🔹 २४ एप्रिल – ‘Total Filmy आणि सामाजिक बांधिलकी’ – मराठी अभिनेता स्वप्निल राजशेखर यांचे रसाळ व सखोल विचार
🔹 २५ एप्रिल – ‘हिमालयाची साद’ – गिर्यारोहण आणि धैर्याच्या कथा सांगणार शरद कुलकर्णी, संभाजी राव गुरव, मेघा परमार व बाल गिर्यारोहक कु. अन्वी घाटगे
🔹 २६ एप्रिल – ‘तेजस्वी स्वा. सावरकर यांची स्फूर्ती गाथा’ – इतिहास आणि प्रेरणादायी विचारांचे सादरीकरण
श्री. सुधांशु नाईक, सौ. आश्लेषा महाजन, सौ. आरती परांजपे, श्री. प्रसाद नातू
🔹 २७ एप्रिल – ‘गोष्ट एका राजहंसाची – संगीताचा अलौकिक प्रवास’ –
कु. अनघा मोडक व ग्रुप यांचा सुमधुर संगीत कार्यक्रम
व्याख्यानमालेची वैशिष्ट्ये:
-
विविध साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक विषयांचा संगम
-
मान्यवर वक्त्यांची उपस्थिती आणि प्रेरणादायी विचारांची मेजवानी
-
लोणावळा व परिसरातील रसिकांना विचारांची पर्वणी
समितीची नवी कार्यकारणी:
-
अध्यक्षा – सौ. स्वरूपा देशपांडे
-
उपाध्यक्ष – श्री. नितीन तिकोणे
-
सचिव – सौ. वैशाली साखरेकर
-
सहसचिव – श्री. संजय वाड
-
कोषाध्यक्षा – चारूलता कमलवार
-
सहकोषाध्यक्षा – संयोगिता साबळे
-
समन्वयक – श्री. प्रशांत पुराणिक, श्री. आनंद गावडे
-
प्रसिद्धी प्रमुख – सौ. श्रावणी कामत