मुंबई – महाराष्ट्र मंत्रिमंडळाने ‘मुंबई सेंट्रल’ स्थानकाचे नामांतर ‘नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस’ असे करण्यास मान्यता दिली असून, आता अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मुंबईच्या सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी विकासात मोलाचे योगदान दिलेल्या नाना शंकरशेठ यांना गौरवण्याच्या हेतूने हा प्रस्ताव करण्यात आला आहे.
१६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता ‘नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समिती’च्या वतीने मुंबई सेंट्रल स्थानकावर नागरिकांची एकत्रित सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या माध्यमातून नामांतराच्या मागणीस जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा आणि केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावा यासाठी जनआंदोलनाचे रूप दिले जात आहे.
नाना शंकरशेठ कोण होते?
नाना जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे (१८०३–१८६५) हे मुंबईच्या विकासाचे शिल्पकार मानले जातात. शिक्षण, आरोग्य, नागरी रचना, सामाजिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. ते पहिले भारतीय होते ज्यांना ‘बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल’वर नामनिर्देशित करण्यात आले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतातील पहिली रेल्वे सुरू होण्यामध्ये भारतीय रेल्वे असोसिएशनच्या स्थापनेद्वारे महत्त्वपूर्ण वाटा उचलला.
त्यांनी मुंबईत पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना केली, आणि सती प्रथेविरोधात आवाज उठवणाऱ्या अग्रणी समाजसुधारकांपैकी ते एक होते. त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘बॉम्बे असोसिएशन’ सारख्या संस्थांची स्थापना केली. याशिवाय, त्यांनी मुंबईतील शेकडो एकर जमीन दान करून आजच्या काळात २-३ लाख कोटी रुपये किंमतीच्या जागेवर सरकारी शैक्षणिक आणि नागरी सुविधा निर्माण झाल्या आहेत.
व्यावसायिक वारसा आणि कुटुंबाचा इतिहास
नाना शंकरशेठ मुरकुटे यांचा मूळ पारंपरिक व्यवसाय मोत्यांच्या व्यापारापासून सुरू होतो. त्यांच्या पूर्वजांनी मुंबईत बँकिंग, चहाच्या व्यापारातही पाय रोवले. त्यांच्या कुटुंबीयांनी १७३३ साली मुंबईत स्थायिक होत ‘अमृतेश्वर मंदिर’ सारखी धार्मिक स्थळे निर्माण केली. त्यांच्या कुटुंबाच्या योगदानामुळे गनबो स्ट्रीट असे रस्त्याचे नामकरण झाले, जे आजही मुंबईच्या इतिहासाचा भाग आहे.
मुंबईतील स्थानकांचे बदललेले नाव
-
व्हिक्टोरिया टर्मिनस → छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
-
एल्फिन्स्टन रोड → प्रभादेवी
-
ओशिवारा → राम मंदिर
-
आगामी प्रस्तावित नामांतरे:
-
करी रोड → लालबाग
-
सॅंडहर्स्ट रोड → डोंगरी
-
मरीन लाईन्स → मुंबादेवी
-
चार्नी रोड → गिरगाव
-
कॉटन ग्रीन → काळाचौकी
-
डॉकयार्ड → मझगाव
-
किंग्ज सर्कल → तीर्थंकर पार्श्वनाथ
-