Home Breaking News बोरघाट भीषण अपघात: वेगवान ट्रकने चार वाहनांना दिली धडक; वडील आणि १०...

बोरघाट भीषण अपघात: वेगवान ट्रकने चार वाहनांना दिली धडक; वडील आणि १० वर्षांची मुलगी ठार, १२ जण जखमी

27
0

लोणावळा, २१ एप्रिल – जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटाजवळ रविवारी रात्री एक हृदयद्रावक अपघात घडला. वेगात असलेल्या ट्रकने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात पुण्याच्या शुक्रवार पेठेतील रहिवासी निलेश संजय लगड (४०) आणि त्यांची १० वर्षांची मुलगी श्राव्या यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत इतर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना रविवारी रात्री १०:१५ च्या सुमारास लोणावळा येथील बॅटरी हिल परिसरात घडली. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकच्या ब्रेकला अचानक अपयश आल्याने हा अपघात झाला. सर्वप्रथम ट्रकने इनोव्हा कारला धडक दिली, त्यानंतर एर्टीगा, टाटा पंच आणि एक रिक्षा यांनाही जोरदार ठोस दिली. ही सर्व वाहने पुण्याच्या दिशेने जात होती.

अपघातानंतर स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची एफआयआर नोंदवण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, परंतु नंतर सर्व वाहने हटवण्यात आली.