पुणे महानगर प्रदेश विकास परिषदेअंतर्गत जिल्हा विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेताना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विविध महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत सूचना दिल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), परिपूरक अर्थव्यवस्था, पर्यावरणपूरक धोरणे तसेच औद्योगिक विकास वाढीसाठी व्यापक नियोजन करण्यात आले.
बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, मैत्री संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विकासाच्या दिशेने मोठी पावले:
🔹 टूल हबसाठी मोठी घोषणा! तळेगाव दाभाडे येथे 300 एकर जागा टूल हबसाठी उपलब्ध केली जाणार. औद्योगिक विकासाला चालना मिळणार. 🔹 पुरंदर विमानतळ प्रकल्प गतीमान! भूसंपादन प्रक्रिया त्वरीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. 🔹 सेंद्रिय कचऱ्यातून गॅस निर्मिती! पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी प्रकल्प हाती घ्यावा, असे निर्देश. 🔹 रस्त्यांचे काँक्रीटीकरण व रुंदीकरण! वाहतूक सुरळीत करण्यासाठी D.P. रोड आखणी व रुंदीकरणाचे आदेश.
महत्त्वाकांक्षी अर्थव्यवस्था वाढीचे उद्दिष्ट:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारत विकसित देश करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, सध्या 3 ट्रिलियन डॉलर असलेली अर्थव्यवस्था 30 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विकास करणे आवश्यक आहे. खासगी क्षेत्र व अशासकीय संस्थांच्या सहभागाने विकासकामे राबविण्यासाठी मैत्री संस्थेची जबाबदारी वाढवण्यात येणार आहे.
📌 बैठकीत महत्त्वाचे मुद्दे:
✔ खाजगी गुंतवणूक वाढविण्यासाठी धोरणात्मक निर्णय ✔ झोपडपट्टीमुक्त पुणे उपक्रम गतीमान करणे ✔ कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा अधिक वापर ✔ वाहतूक सुधारणा व रिंग रोडसाठी भूसंपादन ✔ निर्यात वाढविण्यासाठी आवश्यक धोरणे ✔ उद्योग सेवा केंद्राची उभारणी ✔ पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारणे ✔ बायो-एनर्जी प्लांट आणि मेट्रो मार्गाचा विस्तार
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ग्री हॅकेथॉनच्या आयोजनाबाबत माहिती दिली आणि कृषी, पर्यटन, व उद्योग विकासासाठी आराखडा सादर केला. बैठकीदरम्यान विविध सरकारी विभागांच्या प्रतिनिधींनी आपापल्या क्षेत्रातील योजनांची माहिती दिली.
महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने ठोस पावले टाकली जात असून, पुणे जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्राच्या प्रगतीला नवीन दिशा मिळणार आहे.