पुणे, २५ एप्रिल २०२५ : पुणे जिल्ह्यातील विकासकामांना दर्जा, पारदर्शकता आणि वेळेच्या बंधनाचे पालन मिळावे यासाठी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अनेक दूरगामी निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कामांच्या गुणवत्तेचा मुद्दा ठामपणे मांडत विकासाची नवी दिशा ठरवली.
या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १३७९ कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच विकासकामे दर्जेदार आणि लोकाभिमुख असावीत, यासाठी अनेक ठोस उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
🔹 १५ लाखांपेक्षा कमी निधीच्या कामांना मंजुरी नाही – अपव्यय टाळण्यासाठी आणि दर्जा राखण्यासाठी ठोस निर्णय. 🔹 कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी नेमली जाणार – कामावर सतत लक्ष ठेवले जाणार. 🔹 व्यायामशाळा आणि क्रीडा साहित्य खरेदीमध्ये गुणवत्तानियंत्रणाचे नियम लागू – अप्रामाणिकता रोखण्यासाठी DPC मार्फत नियमन. 🔹 सौर ऊर्जेचा प्रभावी वापर – नवीन शासकीय इमारतींना सौर पॅनेल बंधनकारक, तसेच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आधारित असणार. 🔹 शाळा व अंगणवाड्यांसाठी एकसंध टाईप प्लॅन – शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी अधिक निधीची तरतूद. 🔹 बिल बनवताना ३० सेकंदांची व्हिडिओ क्लिप आवश्यक – कामांची स्थिती अधिक पारदर्शकपणे सादर होणार. 🔹 स्थळ पाहणीवर आधारित अंदाजपत्रक – सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम विभागांना सक्त सूचना. 🔹 विद्युत विभागाकडून कामांची वेळेत व दर्जेदार पूर्तता अनिवार्य – अपूर्ण कामांवर चौकशीची मागणीही झाली. 🔹 वन विभागाने स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत – विद्यमान रस्त्यांच्या कामात अडथळा नको, अशी अजित पवारांची सूचना.
सुनील शेळके यांचा ठाम पवित्रा आणि लोकहिताचा आग्रह
आमदार सुनील शेळके यांनी या बैठकीत स्पष्ट शब्दांत विकासकामांची गुणवत्ता वाढवण्याची मागणी केली. त्यांनी यापूर्वीही विधानसभेत हा मुद्दा अधोरेखित केला होता. त्यांच्या भूमिकेमुळेच समितीने दर्जावर भर देणारे निर्णय घेण्याची तयारी दाखवली.
विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय
या निर्णयांमुळे पुणे जिल्ह्यातील विकासकामांमध्ये सकारात्मक बदल, जलद अंमलबजावणी आणि लोकांचा विश्वास मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील विकासकामांना नवे बळ! – आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश; दर्जेदार विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय