Home Breaking News कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा!

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या – गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा!

80
0

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यानंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या प्रकरणावर आता राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून, त्याच्या बँक खात्याची चौकशी तसेच कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) तपासले जाणार असल्याची मोठी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत केली आहे.

योगेश कदम यांनी काय म्हटले?

👉 कुणाल कामरा कोणाच्या सांगण्यावरून हे वक्तव्य करतोय?
👉 त्याच्या बँक व्यवहारांची चौकशी करून ‘बोलवता धनी’ शोधला जाईल.
👉 अशा प्रकारची स्टँडअप कॉमेडी सरकार चालू देणार नाही.
👉 सर्वोच्च पदांवर असलेल्या व्यक्तींवर अशा पद्धतीने टीका करणे गंभीर विषय आहे.

कुणाल कामराची संपत्ती किती?

कुणाल कामरा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कमाई करतो. प्रत्येक शोसाठी तो १२ ते १५ लाख रुपये घेतो.

🔹 त्याची संपत्ती अंदाजे १ कोटी ते ६ कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज
🔹 यूट्यूब, शो आणि जाहिरातींमधून प्रचंड उत्पन्न
🔹 राजकीय वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत

यापूर्वीही अनेक वादग्रस्त वक्तव्ये

कुणाल कामराने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील अनेकदा सडकून टीका केली आहे.
2020 मध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यासोबत विमानात वाद घातल्यामुळे इंडिगो, एअर इंडिया, गो एअर आणि स्पाईसजेटने त्याच्यावर ६ महिन्यांसाठी विमान प्रवास बंदी घातली होती.

शिंदेसेनेचा आक्रमक पवित्रा – हॉटेल आणि स्टुडिओची तोडफोड

कुणाल कामराने आपल्या कार्यक्रमात ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो पे चष्मा… हाये…’ या गाण्याच्या चालीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली. यावर शिंदे गट आक्रमक झाला आणि कार्यक्रम झालेल्या हॉटेलची तोडफोड केली.

🔹 मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड – ४० शिवसैनिकांवर गुन्हा दाखल
🔹 कुणाल कामराच्या वक्तव्यांवर भाजप आणि शिंदेसेनेचा संताप
🔹 विरोधकांची प्रतिक्रिया – सरकारकडून टीकाकारांना लक्ष्य केले जात आहे?