🚦 वाहतूक पोलिसांचा महत्त्वाचा निर्णय, नागरीकांना सहकार्याची विनंती 🚦
📍 पुणे – पुणे शहरातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या कसबा गणपती मंदिर परिसरातील पार्किंग व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. वाढत्या वाहतुकीच्या ओघामुळे आणि रस्त्याच्या दुतर्फा पार्क होणाऱ्या वाहनांमुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
पोलिस उपआयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करून शिवाजी रोड ते गणेश रोड दरम्यान पार्किंग झोन निश्चित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
🚗 कसबा गणपती परिसरातील नवीन पार्किंग व्यवस्था
🔹 शिवाजी रोडवरील कसबा गणपती कमान ते गणेश रोडवरील कसबा गणपती कमान दरम्यान 📍 पी-१ आणि पी-२ पार्किंग झोन निश्चित
🚧 यापूर्वी अस्तित्वात असलेले पार्किंग संदर्भातील सर्व आदेश रद्द करण्यात आले आहेत.
नागरिकांनी कळवाव्यात सूचना आणि हरकती
🚨 ११ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पुणे वाहतूक पोलिसांकडे नागरिक आपल्या सूचना लेखी स्वरूपात सादर करू शकतात. 📝 सूचना पाठवण्याचा पत्ता: 🚔 पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्र. ६, एअरपोर्ट रोड, पुणे
वाहतूक पोलिसांचे आवाहन:
✅ अत्यावश्यक सेवा (फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका) यांना वगळून अंतिम आदेश जारी करण्यात येतील. ✅ परिसरातील दुकानदार, प्रतिष्ठान मालक आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा. ✅ पोलिसांकडून संपूर्ण परिसरात नागरिकांसाठी नवीन मार्गदर्शक फलक लावले जातील जेणेकरून कोणीही गोंधळात पडू नये.
पोलिस प्रशासनाची कार्यवाही:
🔹 स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना सूचना देण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिम राबवली जाणार. 🔹 वाहतूक विभागाच्या अधिकृत वेबसाईट तसेच फेसबुक आणि ट्विटरवर अधिकृत माहिती प्रसिद्ध केली जाईल. 🔹 सर्व स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये ही माहिती प्रकाशित केली जाणार आहे.
🚗 नवीन पार्किंग व्यवस्थेमुळे वाहतुकीस मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून पुणेकरांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.