Home Breaking News पुणे पोलिसांचा नागरिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम! दर शनिवारी “तक्रार निवारण दिन”

पुणे पोलिसांचा नागरिकांसाठी महत्त्वाचा उपक्रम! दर शनिवारी “तक्रार निवारण दिन”

53
0

  तारीख : १५ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) | वेळ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०

पुणे शहरातील नागरिकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी पुणे पोलिसांनी दर शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’ आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, प्रत्येक शनिवारी पोलीस उपआयुक्त (DCP), सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) व वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) नागरिकांच्या थेट तक्रारी ऐकून तत्काळ निर्णय घेतील.

👮 तक्रार निवारण दिनाचे वैशिष्ट्ये :

नागरिकांना त्यांच्या तक्रारींसाठी पोलीस अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता येणार
प्रलंबित गुन्ह्यांसंदर्भात माहिती घेता येणार
पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या सोडवण्यास मदत
वाहतूक, आर्थिक गुन्हे, सायबर क्राईम यासंबंधी मार्गदर्शन मिळणार

📍 कोणत्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार निवारण होणार?

🔹 परिमंडळ १: खडक, फरासखाना, समर्थ
🔹 परिमंडळ २: भारती विद्यापीठ, विश्रामबाग
🔹 परिमंडळ ३: सिंहगडरोड, लष्कर
🔹 परिमंडळ ४: येरवडा, स्वारगेट, बंडगार्डन, सहकारनगर
🔹 परिमंडळ ५: कोंढवा, कोथरुड, वारजे माळवाडी
🔹 गुन्हे शाखा: वारजे माळवाडी, सिंहगडरोड, पर्वती
🔹 मुख्यालय: हडपसर, खडकी
🔹 आर्थिक व सायबर गुन्हे: बंडगार्डन, येरवडा
🔹 विशेष शाखा: शिवाजीनगर, हडपसर, चतुःश्रृंगी, लोणीकंद
🔹 वाहतूक विभाग: चतुःश्रृंगी, वानवडी, चंदननगर, डेक्कन, आंबेगाव, काळेपडळ

💡 ज्या ठिकाणी पोलीस उपआयुक्त किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त हजर राहणार नाहीत, तिथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (PI) तक्रार निवारण करतील.

🚨 नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन:

प्रलंबित तक्रारी असलेल्या नागरिकांनी संबंधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे.
स्वतः पोलिसांकडून योग्य न्याय मिळावा यासाठी हा सुवर्णसंधी आहे.
संबंधित पोलीस अधिकारी थेट तक्रारी ऐकून त्वरित निर्णय घेणार आहेत.