Home Breaking News एसबीपीआयएमच्या विद्यार्थ्यांचा बेंगलोर आणि कोल्हापूरमधील औद्योगिक भेट दौरा – उद्योग क्षेत्रातील माहिती...

एसबीपीआयएमच्या विद्यार्थ्यांचा बेंगलोर आणि कोल्हापूरमधील औद्योगिक भेट दौरा – उद्योग क्षेत्रातील माहिती आणि अनुभव

34
0
पिंपरी चिंचवड, पुणे – ६ फेब्रुवारी २०२५:
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) च्या विद्यार्थ्यांनी बेंगलोर आणि कोल्हापूर येथे विविध औद्योगिक क्षेत्रांचा अभ्यास केला. या दौऱ्यात बेंगलोरमधील इसरो, आयआयएम, हिंदुस्तान ॲरोनॉटिकल लिमिटेड, ट्रीनीटी एडीटी आणि कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज सहकारी साखर कारखाना, आदित्य बिर्ला यांचा ग्रासीम उद्योग यांसारख्या प्रमुख उद्योग समूहांना भेट देण्यात आली.
संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार्याने प्रा. डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. दिलीप पवार आणि अनघा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या या दौऱ्याचे समन्वयक म्हणून कार्य केले. औद्योगिक भेटीचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगांमधल्या विविध प्रक्रियांवर गहन माहिती मिळवून देणे आणि त्यांचे औद्योगिक कार्यप्रणालीतील अनुभव समजून घेणे होता. विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने प्रात्यक्षिक शिक्षणाचा अनुभवही मिळाला.
संपूर्ण दौऱ्यात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील विविध नवनवीन तंत्रज्ञान, कार्यप्रणाली आणि उत्पादन प्रक्रियेची माहिती मिळवून देण्यात आली. तसेच, प्रत्येक उद्योगाच्या व्यवस्थापन पद्धतीचा थेट अनुभव घेतल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करियरसाठी एक महत्त्वाची दिशा ठरवली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील आणि उद्योजक नरेंद्र लांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्व विद्यार्थी हे अत्याधुनिक उद्योग व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचे एक आदर्श उदाहरण समजून या दौऱ्याला अविस्मरणीय मानतात, आणि भविष्यात औद्योगिक क्षेत्रातील महत्वाच्या स्थानासाठी त्यांची तयारी करू इच्छितात.