Home Breaking News विनायक चतुर्थी निमित्त पुण्यात वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल, पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होण्याची...

विनायक चतुर्थी निमित्त पुण्यात वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल, पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता

37
0
शनिवार, १ फेब्रुवारी २०२५ रोजी विनायक चतुर्थी असून, यानिमित्त पुणे शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. विशेषतः शनिवारवाडा, भिडे वाडा, तुळशीबाग, आणि श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिर परिसरात भाविकांची आणि पर्यटकीय गर्दी होणार आहे. त्यामुळे त्या भागातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड आणि इतर मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची आणि वाहतुकीचे प्रमाण संथ होण्याची शक्यता आहे.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहराच्या वाहतूक उप आयुक्त, अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, १ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजेपासून काही मार्गांवर वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे.
वाहतूक बदलाचे मुख्य मुद्दे:
  1. शिवाजी रोडवरून स्वारगेटला जाणारे वाहन चालक स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, टिळक चौक-टिळक रोडने इच्छित स्थळी जाऊ शकतात.
  2. स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालक जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जाऊ शकतात.
  3. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक बाजीराव रोडने शनिवार वाडा येथून इच्छित स्थळी जाईल.
यासह, अत्यावश्यक सेवेसाठी (फायरब्रिगेड, रुग्णवाहिका इत्यादी) वाहने सुट्टी दिली जाईल. स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, तसेच या बदलांची अंमलबजावणी योग्य आणि सुरक्षीतपणे होईल याची काळजी घेतली जाईल.