🚔 गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी मोहीम
🚔 तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त
🚔 शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांची कठोर पावले
पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार आणि मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने तिन्ही वेगवेगळ्या कारवायांमध्ये २५ लाख ५१ हजार रुपयांचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि गांजा जप्त करून मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे.
पहिली कारवाई – १९.१७ लाखांचा एम.डी. जप्त
दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक २ च्या पथकाने लोहगाव-वाघोली रोड, संतनगर, पुणे येथे सापळा रचून कुमेल महम्मद तांबोळी (वय २८, रा. धानोरी, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८३ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि अन्य साहित्य असा एकूण १९,१७,३००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. ६७/२०२५) दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसरी कारवाई – ३५० ग्रॅम गांजा जप्त
दि. ३० जानेवारी २०२५ रोजी मार्केटयार्ड परिसरात पोलीस अंमलदार अझीम शेख यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आनंदनगर, बिबवेवाडी रोड, मार्केटयार्ड येथे छापा टाकून सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख (वय ५२, रा. आनंदनगर, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून ३५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ७,००० रुपये इतकी आहे. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी कारवाई – ६.२७ लाखांचा एम.डी. जप्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाने विमाननगर चौक ते श्रीकृष्ण हॉटेल रोडवर छापा टाकतकिरण भाऊसाहेब तुजारे (वय २४, रा. आव्हाळवाडी, वाघोली, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून ३० ग्रॅम ३५ मिग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि इतर साहित्य असा एकूण ६,२७,०००/- रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेंतर्गत पुढेही अशाच प्रकारे कारवाई केली जाणार असून ड्रग्ज विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. शहरात कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा संशयास्पद व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
🛑 पुणे पोलिसांच्या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा धक्का
🛑 अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मिळतेय यश
🛑 पुण्यातून ड्रग्जचे समूळ उच्चाटन करण्याचा पोलिसांचा संकल्प