पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर मोठी कारवाई
📌 गुन्हेगारीची उदात्तीकरण करणाऱ्या १३ इंस्टाग्राम अकाउंट धारकांवर गुन्हे दाखल
📌 ‘गजानन मारणे’ नावाने दहशत निर्माण करणाऱ्या रील्सचा पर्दाफाश
पुणे शहरात गुन्हेगारीचं उदात्तीकरण करून समाजात दहशत माजवण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काही समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करत गुन्हेगारांना हिरो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा सोशल मीडिया अकाउंटवर बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
🔴 गुन्हेगारीच्या रील्सचा पर्दाफाश!
पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे आणि पोलीस उपआयुक्त श्री. निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २ च्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि त्यांच्या पथकाने विशेष मोहिम राबवली.
या मोहिमेअंतर्गत हमराज चौक, कोथरूड, पुणे येथील कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याच्या नावाने चालवले जाणारे १३ इंस्टाग्राम अकाउंट सक्रिय असल्याची माहिती मिळाली. या अकाउंट्सवरून “KING OF PUNE CITY”, “पुण्यातील दादा”, “पुण्याचा बाप कोण आहे”, “यहा का मै हुं किंग”, “अगर इसके अलवा और कुछ करने की कोशिस की, तो तेरे टुकडे-टुकडे कर दूंगा” असे धक्कादायक व्हिडीओ आणि रील्स प्रसारित केल्या जात होत्या.
🔴 कारवाईत चार आरोपी जेरबंद
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे चार इसमांना ताब्यात घेतले:
1️⃣ अक्षय निवृत्ती शिंदे (२० वर्षे), रा. निमगाव खालू, श्रीगोंदा, जि. अहमदनगर
2️⃣ सिद्धार्थ विवेकानंद जाधव (१९ वर्षे), रा. विठ्ठल मंदिराजवळ, महंमदवाडी, हडपसर, पुणे
3️⃣ साहिल शादुल शेख (१९ वर्षे), रा. सुम्बा, धाराशिव
4️⃣ इरफान हसन शेख (१९ वर्षे), रा. सुम्बा, धाराशिव
यांच्याविरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३/२०२५ नुसार IPC २२३, ३५३ (१)(ब), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(२)(३), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारांची प्रतिमा उंचावणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल.
🔴 पोलिसांनी केलेल्या कारवाईतील अधिकारी आणि कर्मचारी
🔹 पोलीस आयुक्त – श्री. अमितेश कुमार
🔹 सह पोलीस आयुक्त – श्री. रंजनकुमार शर्मा
🔹 अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) – श्री. शैलेश बलकवडे
🔹 पोलीस उप आयुक्त (गुन्हे) – श्री. निखील पिंगळे
🔹 सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे – २) – श्री. राजेंद्र मुळे
🔹 वरीष्ठ पोलीस निरीक्षक – श्री. विजय कुंभार
🔹 पोलीस अंमलदार – प्रशांत शिंदे, सुरेंद्र जगदाळे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, दिलीप गोरे, चेतन चव्हाण, संग्राम शिनगारे