
पुण्याच्या ऐतिहासिक रिंग रोड प्रकल्पाची बहुप्रतीक्षित सुरुवात झाली असून, पूर्व टप्प्याचे प्रारंभिक काम वाडेबोल्हाई गावाजवळ सुरू झाले आहे. पुणे नगर रस्ता आणि सोलापूर महामार्गाला जोडणारा २४.५ किलोमीटरचा टप्पा हा प्रकल्पाचा पहिला भाग असून, याचा ठेका रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आहे. कंपनीने वाडेबोल्हाई येथे आपले कार्यक्षेत्र उभारले आहे आणि प्रकल्पाच्या कामासाठी १०० हून अधिक खोदकाम यंत्रसामग्री तैनात केली आहे.