Home Breaking News “पिंपरी कॅम्प भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद: दुरुस्तीच्या कामासाठी १० ऑक्टोबरला महावितरणची मोठी...

“पिंपरी कॅम्प भागात गुरुवारी वीजपुरवठा बंद: दुरुस्तीच्या कामासाठी १० ऑक्टोबरला महावितरणची मोठी घोषणा”

75
0

सर्व वीज ग्राहकांना नम्र सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे की, गुरुवार दि. 10.10.2024 रोजी पिंपरी कॅम्प भागातील वीजपुरवठा काही काळासाठी बंद राहणार आहे. सकाळी 10:00 वाजल्यापासून दुपारी 2:00 वाजेपर्यंत महावितरणकडून 22 के.व्ही. वाघेरे फिडरवर अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या दुरुस्तीच्या कामादरम्यान नानेकर कॉम्प्लेक्स परिसर, शिवदत्त नगर, भीम नगर, बालामल चाळ, नवीन आणि जुना काटे पिंपळे रोड, माळी आळी, वाघेरे कॉलोनी (१ ते ४), गीता निवास परिसर, भैरवनाथ मंदिर परिसर, कुदळे कॉलोनी (१ ते ४), रवि सोसायटी, बालगोपाल शाळा परिसर, अशोक थिएटर रोड, मारुती कॉम्प्लेक्स, गेलार्ड चौक, जुने रजिस्ट्रेशन ऑफिस, डेअरी फार्म रोड, शास्त्री गार्डन, प्रेमप्रकाश मंदिर परिसर, शनिमंदिर परिसर, PWD, सी ब्लॉक, आणि आयप्पा मंदिर परिसर या ठिकाणांवरील वीजपुरवठा बंद असेल.

महावितरणकडून ही तातडीची कामे पूर्ण करण्यासाठी सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे, ही विनंती आहे. या कामामुळे भविष्यात अधिक सुरक्षित व स्थिर वीजपुरवठा देण्यात येईल, याची खात्री आहे. तसेच, नागरिकांनी आपल्या कामांची पूर्वतयारी करून ठेवल्यास ही बंदी काळात होणाऱ्या असुविधेपासून बचाव करता येईल.

तरी सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी आणि महावितरणच्या वतीने केलेल्या कामात सहकार्य करावे, ह्या सूचना वेळेवर मिळाल्याने वीज ग्राहकांनी आपल्या दैनंदिन कामांमध्ये योग्य तो बदल करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.