Home Breaking News पुणे अपघात प्रकरणावर बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “घरात पैसा जास्त...

पुणे अपघात प्रकरणावर बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “घरात पैसा जास्त झाला की रस्त्यावर…”

139
0

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार अपघात प्रकरणावर प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून एका अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. यानंतर अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पब मालकांवरही गुन्हा दाखल करत त्यांनाही अटक केली आहे. या प्रकरणाची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेवर आता प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“घरात एवढा पैसा झाल्यावर रस्त्यावर अशी मस्ती येते. पैशामुळे असे लोभी लोक माणुसकी विसरत चालले आहेत. अशा अपघातामध्ये काही बदल होणं, अशा प्रकारे बेदरकारपणे कार चावलणं चुकीचं आहे. डान्सबार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले लोक आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात”, अशी संतप्त प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी पुणे अपघात प्रकरणावर बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here